Wednesday, April 14, 2010

माझा वाडा

बाजूची दिसणारी माझ्या चुलत भावाची (संजूची ) पिठाची गिरणी आहे . समोरचे घर माझ्या काकाचे म्हणजे श्री .विजय पाटील यांचे आहे. कॅमेरा हातात होता म्हणून टिपला एक हसतानाचा क्षण !
समोर दिसणारी बैल गाडी बहुतेक नामदेव दादांची आहे . कितीतरी दिवस झाले असतील बैल गाडीवर बसून ! खूप आठवण येते मागे वळून पहिले कि !
आणि हा बघा छोटासा बगीचा ! संजूच्या नव्हे ,अहो ,प्रतीकच्या गिरणीसमोरचा आहे तो !
आणि हीच ती पतीक पाटीलची पिठाची गिरणी !






आमच्या घराची गच्ची आहे संजूचा मुलगा प्रतिक , मी,आणि माझे वडील गच्चीवर उभे आहेत .

मागच्या महिन्यात आम्ही किन्हीला गेलो होतो तेव्हा वाड्यात एक छान पिल्लू होते त्याचा फोटो काढायचा मोह आवरता आला नाही
हाच तो आमचा पाटील वाडा ! खूप खूप आठवणी आहेत साठवलेल्या मनात या वाड्याविषयी !

काय करू ?

When i think there will be something,
i found nothing---!
When i found something,
nobody accepted---!
When i accepted something ,
all said ''useless---!
while i was going ,
Nobody following---!
When i followed ,
i failed and failed !
When i sang ,
Nobody heared---!
When i heared ,
Few said ''Oh,boaring---!
Now i am donig nothing ,
all are doing---!
But what i acually ''want '--?
i dont know --?
Anybody, can help me ?
Are you also confused --?
Think yourself,---when you are thinking --
Who is observing ---?
Anyone observing ,--is it with thinking ?
But why ---
Nobody knows --!
i think nobody knows --
But there should be one who knows everything--!
Who will be that--!
Sorry,i am helpless !

Friday, April 9, 2010















































आमचे गाव किन्ही ,तालुका भुसावळमध्ये आहे .एक टुमदार खेडे आहे ,तसे किन्ही गाव आता खेडं राहिले नाही .
आमच्या गावात एक मोठे हायस्कूल आहे .बँक आहे ,दुध फेडरेशन आहे ,तेल्बियाची संस्था ,प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. समाजासाठी लागणारे असे सर्व काही आहे .
शिक्षणामध्ये आमचे गाव फार पुढे आहे . गावातील कितीतरी लोक शिक्षणासाठी ,नोकरीसाठी ,व्यवसायासाठी गाव सोडून गेले आहे . हजारो लोक डोंबिवलीला ,कल्याणला ,बदलापूर, अंबरनाथ, आजूबाजूच्या शहरामध्ये राहत आहे. आम्ही रहिवाशांनी दरवर्षी वार्षिक भेट कार्यक्रम ठरविला आहे.या वर्षीपण
आमचा कार्यक्रम आनंदाने पार पडला .

सकाळी आम्ही आठ वाजेपासून डोंबिवलीच्या खंडोबा मंदिरामध्ये जमायला सुरुवात केली .हे खंडोबाचे मंदिर डोंबिवली पशिमेला आहे.
हे मन्दिर लहान आहे पण फारच सुंदर आहे .मंदिरासमोर सुमारे पाचशे हजार लोक बसतील एवढे पत्र्याचे छत मंदिराच्या आजूबाजूला शेती आहे. सुंदर निसर्ग आहे.आहे .
आमच्या मंडळामधील एक कार्यकर्ते श्री.येवले (येवले ,रेल्वेमध्ये कामाला आहे ) त्यांनी ह्या वर्षीचा जेवणाच्या खर्च दिला होता
तसे आम्ही आतापर्यंत स्वतः सर्व मिळून पार्टीचे जेवण तयार करायचो पण या वर्षापासून असे ठरवले कि पार्टीचे खाद्यपदार्थ भाड्याने तयार करून घ्यायचे त्यामुळे सर्वाना वेळ मिळतो आणि त्यामुळे इतर कार्यक्रम चांगले होतात.बायाबापड्यांच्या गप्पापण चांगल्या रंगतात स्वयंपाकी सकाळीच लवकर आले आणि पदार्थ बनवायला सुरुवात केली .बेत साधाच होता . शिरापुरी ,केशरीभात,कढी,मटरपनीर आणखी ------!
सकाळी आल्याआल्या नाश्ता तयार होता .मस्त चमचमीत भेळ होती. मी तर दोन डिश हाणल्या .नंतर चहापान घेतला
नंतर ओळखपाळख झाली सर्वाची ! .नंतर कार्यक्रमाचे प्रमुख श्री लीलाधर पाटील ( बदलापूर हायस्कूल मधील शिक्षक ) यांनी प्रास्ताविक भाषण केले . दरवर्षीप्रमाणे यावर्शीपण त्यांनी छान मार्गदर्शन केले. नंतर थोडे विनोदी गप्पा सुरु झाल्या दरवर्षीप्रमाणे यावर्शीपण जेष्ट नागरिकांचा सत्कार झाला यावर्षी श्री भास्कर पाटील आणि मधुकर पाटील यांचा सत्कार झाला त्यांनीपण कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि मग सुरु झाल्या लहानग्यांच्या शर्यती आणि स्पर्धा -----------आणि मोठ्यांसाठी हाउजी खेळण्यात आले आम्हाला बक्षीस पण मिळाले सगळ्या स्पर्धा नंतर बक्षिसे देण्यात आली ती सर्व श्री पंडित जावळे यांच्यातर्फे होती. सुधाकर पाटील, विजय येवले ,श्रीनिवास चौधरी , अशोक पाटील ,मनोहर चौधरी विजय येवले, सुरेश येवले ,प्रशांत पाटील ,सुभाष पाटील ,तुषार आणि दीपक चौधरी, मनीष चौधरी, चंद्रकांत बह्राटे, किशोर येवले आणि इतर रहिवाशी सहकुटुंब हजर होते. यानंतर सहभोजनाचा सर्वांनी भरपूर आनंद घेतला.
अशारितीने आमचा कार्यक्रम पार पडला.मात्र यापुढील वर्षीचा कार्यक्रम यापेक्षा चांगला होईल अशी खात्री आहे
. सगळ्यांचे आभार
v